दहीगाव पंपींग स्टेशन येथे नियमित वीज पुरवठा होण्यासाठी खासदार मोहिते पाटील यांना निवेदन
By : Polticalface Team ,15-07-2025
दहीगाव पंपींग स्टेशन येथे नियमित वीज पुरवठा होण्यासाठी खासदार मोहिते पाटील यांना निवेदन
करमाळा:- प्रतिनिधी
दहीगाव ता, करमाळा येथील दहीगाव पंपींग स्टेशन येथे नियमित वीज पुरवठा करण्यात यावा यामध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी लक्ष घालावे यासाठी करमाळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक संजय सावंत, माजी नगरसेवक फारुक जमादार, आदिनाथ सहकारी साखर कारखान्यांचे संचालक ऍड राहुल सावंत, महेश मोरे, पांडुरंग सावंत, बापू उबाळे यांनी निवेदन दिले
यावेळी मोहिते पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करमाळा नगरपरिषदेच्या दहीगाव पंपींग स्टेशन येथे नियमित पणे वीज पुरवठा होत नाही तसेच रात्री च्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यास कर्मचारी सकाळी येतात अश्या घटना मुळे करमाळा शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे गेल्या अनेक दिवसांपासून करमाळा नगरपरिषदेचा पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्यामुळे आज माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेऊन दहीगाव येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे
वाचक क्रमांक :