By : Polticalface Team ,2025-07-06
लिंपणगाव( प्रतिनिधी )- श्रीगोंदा तहसील कार्यालय येथे बुधवारी दोन जुलै रोजी अहिल्यानगर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी भेट दिली असता महाराष्ट्र राज्य शिवा पानंद चळवळीच्या वतीने श्रीगोंदा तहसील कार्यालय येथे भेट घेऊन श्रीगोंदा तालुक्यातील प्रलंबित रस्त्याविषयी चालू असलेल्या कामा बाबत शिवपानंद शेत रस्ते चळवळीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी या निवेदनात शिवपानंद शेत रस्ते चळवळीचे समन्वयक दादासाहेब जंगले यांनी नगर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये रस्त्याविषयी कामे संत गतीने चालू आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांची समन्वय बैठक आयोजित करून कामाचा आढावा घेण्यात यावा व श्रीगोंदा तहसील कार्यालय येथे कायमस्वरूपी तहसीलदारांची नेमणूक करण्यात यावी. या संदर्भात जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले. आज श्रीगोंदा तालुक्याचे नवीन प्रभारी तहसीलदार सचिन डोंगरे यांची नियुक्ती झाली . यानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन श्रीगोंदा तालुक्यात ऐतिहासिक रस्ते विषयी चळवळीच्या कामाविषयी आढावा देण्यात आला. आपल्या प्रलंबित रस्ता कामांना पूर्ण सहकार्य केले जाईल. असे आश्वासन तहसीलदार श्री डोंगरे यांनी दिले या निमित्त तहसीलदार डोंगरे यांना कर्माचा सिद्धांत हे पुस्तक भेट देण्यात आले.
वाचक क्रमांक :