पन्हाळा ते पावनखिंड वीर बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्यगाथा. मराठ्याच्या अतुलनीय पराक्रमाने घोडखिंड झाली पावन.
By : Polticalface Team ,14-07-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १५ जुलै २०२५ पन्हाळा ते पावनखिंड शौर्यगाथा मोहिमेचे आयोजन मावळे दुर्गवडे या ट्रेकिंग ग्रुपच्या वतीने दिनांक १२ व १३ जुलै रोजी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सरदार वीर बाजीप्रभू देशपांडे त्यांचे बंधू फुलाजी देशपांडे सह ३०० च्या आसपास असलेल्या बांदल सैन्याच्या बलिदानाने
पावन झालेली घोडखिंड मराठ्याच्या अतुलनीय पराक्रमाने आणि रक्तरंजित लढाईने इतिहासात अजरामर असलेल्या लढायापैकी एक महत्त्वाची लढाई म्हणजे पावनखिंड मानली जाते
या प्रसंगी स्वराज्यावर आलेले संकट खूप मोठे होते सहा महिन्याच्या कालावधी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यावर होते. त्याच वेळी पन्हाळा येथून विशाळ गडावर जाण्यासाठी एक मोहीम आखण्यात आली. यामध्ये वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी ज्या पद्धतीने गनिम रोखण्यासाठी खिंड लढवली हि लढाई सात ते आठ तास रोखुन धरली यामध्ये वीर बाजीप्रभू देशपांडे व तीनशे बांदल सैन्याच्या बलिदानाने ही घोडखिंड पावन झाली आणि त्याच इतिहासाचे स्मरण म्हणून ही मोहीम आखण्यात येते. मावळे दुर्गवेडे या ट्रेकिंग ग्रुप मध्ये ६५ युवा तरुण मावळ्यांनी भाग घेतला होता सुनिल कळसकर यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले.
स्वराज्यावर आलेले प्रत्येक संकट हे बलशाली होते आणि प्रत्येक क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांनी ते संयम शांतता आणि वेळ प्रसंगी धोका पत्करून पन्हाळा ते पावनखिंड ही मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांनी आखली याचे स्मरण आजच्या युवा तरुण मावळ्यांना व्हावे म्हणून प्रत्येकाने या मोहिमेत सहभाग घ्यावा अशी प्रतिक्रिया डॉ.संतोष जठार यांनी बोलताना व्यक्त केली.
या वेळी डॉ.सुजित शेलार यांनी या मोहिमेचे आयोजन केले तसेच या कार्यांत एक वेगळे समाधान मिळते असे त्यांनी बोलताना सांगितले या प्रसंगी डॉ.सुनिल देशमुख डॉ संजय कळसकर, अभिजित पवार. संतोष पवार प्रशांत पवार. अमृत ढवळे, कुंजीर साहेब, अभीजीत पवार, शिरीष माळवदकर साठे तसेच काष्टी तांदळी वडगाव रासाई बीड वाशिम लातूर देऊळगाव श्रीगोंदा येथील अनेकजण सहभागी झाले होते सर्वांच्या सहकार्यानं ही शौर्य मोहीम यशस्वी झाली.
वाचक क्रमांक :