पोलीस उप मुख्यालय बारामती बऱ्हाणपुर येथे मा.श्री संदीपसिंह गिल्ल (भापोसे) पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत एम.आय.डी.सी.परीसरातील उद्योजकांची बैठक संपन्न
By : Polticalface Team ,15-07-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दिनांक १५/०७/२०२५ रोजी पोलीस उप मुख्यालय बारामती येथे बारामती विभागातील औद्योगीक क्षेत्रातील कंपनींचे पदाधिकारी यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती.
सदर बैठकीमध्ये मा.श्री.संदीपसिंह गिल्ल पोलीस अधीक्षक व मा.श्री गणेश बिरादार अपर पोलीस अधीक्षक बारामती यांनी उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले. या वेळी काही उद्योजकांनी एमआय डी सी परीसरातील वाहतुक समस्या व त्यांना येणाऱ्या अडी अडचणीं बाबत मा.पोलीस अधीक्षक यांना माहीती दिली. त्यावर पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांनी उद्योजकांना येणारे अडी अडचणीं बाबत उपाय योजना करणेचे आश्वासन दिले. श्री.संदीपसिंह गिल्ल पोलीस अधीक्षक बोलताना म्हणाले औद्योगीक क्षेत्रामध्ये जर गुन्हेगारी प्रवृत्तीचे कोणी उपद्रव निर्माण करीत असतील तर अशा व्यक्तीं विरूध्द कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन उपस्थितांना दिले
सदर बैठकीस श्री.संदीपसिंह गिल्ल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री गणेश बिरादार अपर पोलीस अधीक्षक बारामती श्री सुदर्शन राठोड उप विभागीय पोलीस अधिकारी बारामती उप विभाग श्री तानाजी बरडे उप विभागीय पोलीस अधिकारी भोर उप विभाग श्री बापुराव दडस उप विभागीय अधिकारी दौंड तसेच बारामती विभागातील बारामती कुंरकुंभ रांजनगाव जेजुरी इतर एम.आय.डी.सी. मधील सुमारे ११५ उद्योजक या वेळी उपस्थित होते.
पोलीस उप मुख्यालय बारामती बऱ्हाणपुर येथे प्रसिध्द शिवव्याख्याते श्री प्रशांत देशमुख यांचे प्रभावी जनजागृती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते
दिनांक १५/०७/२०२५ रोजी पोलीस उप मुख्यालय बारामती येथे प्रसिध्द शिवव्याख्याते श्री प्रशांत देशमुख यांचे प्रताप गड पायथा युध्द व छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची युध्द निती यावर व्याख्यान पार पडले.
या वेळी शिवव्याख्याते श्री प्रशांत देशमुख यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे मनोधैर्य वाढविण्याचे दृष्टीने प्रताप गडचे युध्द व छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची युध्दनिती यावर व्याख्यान देवुन प्रबोधन केले.
सदर शिबिरास श्री.संदीपसिंह गिल्ल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री गणेश बिरादार अपर पोलीस अधीक्षक बारामती श्री सुदर्शन राठोड उप विभागीय पोलीस अधिकारी बारामती उप विभाग श्री तानाजी बरडे उप विभागीय पोलीस अधिकारी भोर उप विभाग श्री बापुराव दडस उप विभागीय अधिकारी दौंड, तसेच बारामती विभागातील एकुण १५ पोलीस ठाण्यांकडील २८ पोलीस अधिकारी व २१० पोलीस अंमलदार उपस्थित होते.
पुणे ग्रामीण पोलीस दलातील बारामती विभागामधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे करीता ताण तणाव मुक्त शिबिर आयोजित करण्यात आले होते
पुणे ग्रामीण पोलीस दलातील अपुरे मनुष्यबळ व वाढत्या लोकसंख्येमुळे पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेवर कामाचा अतिरीक्त ताण पडत आहे. त्यातुन पोलीस अधिकारी व अंमलदार यांची मानसिकता कणखर रहावी या करीता पोलीस उप मुख्यालय बारामती येथे बारामती विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे करीता दिनांक १५/०७/२०२५ रोजी ताण तणाव मुक्त शिबिर आयोजीत करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये डॉ.श्री संतोष मंगलाई सदाशिव मचाले यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार यांना ताण तणावा पासुन कसे दुर राहता येईल मानसीक तणाव मुक्त शांतता या बाबत धडे देवुन मार्गदर्शन केले. सदर शिबिरास श्री.संदीपसिंह गिल्ल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री गणेश बिरादार अपर पोलीस अधीक्षक बारामती श्री सुदर्शन राठोड उप विभागीय पोलीस अधिकारी बारामती उप विभाग श्री तानाजी बरडे उप विभागीय पोलीस अधिकारी भोर उप विभाग श्री बापुराव दडस उप विभागीय अधिकारी दौंड, तसेच बारामती विभागातील एकुण १५ पोलीस ठाण्यांकडील २८ पोलीस अधिकारी व २१० पोलीस अंमलदार उपस्थित होते.
वाचक क्रमांक :